महाराष्ट्र मंडळ फ्रान्स’ ची स्थापना
‘महाराष्ट्र मंडळ फ्रान्स’ ची स्थापना झाली त्याचा ‘पाया’ महाराष्ट्रातील सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व त्यांचा प्रसार असा. महाराष्ट्रातील फ्रेंच व फ्रांसमधील महाराष्ट्रीयांना त्याचा फायदा व्हावा ही कल्पना.
त्यासाठी ध्येय ठरविली :
१) फ्रांको-मराठी देवाण घेवाण होण्याच्यादृष्टीने शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात नवीन प्रकल्पांचा शोध व मदत.
२) मराठी भाषा व मराठी सांस्कृतिक ठेव्याचा प्रसार व त्यासाठी कार्यक्रमाचे आयॊजन.
३) तरुण व्यावसायिकांना आवश्यक ती माहिती मिळवून देणे व शक्य ती मदत करणे
सध्या फ्रान्समध्ये महाराष्ट्रीयन्सची संख्या फारच कमी आहे. पण आजच्या जागतिक एकीकरणाच्या काळात मराठी तरुणाची वाढती जागतिक ओढ व आकर्षण लक्षात घेता ही संख्या वाढतच जाणार हे लक्षात घेऊन महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली.