Sankrant 2011
मकर संक्रांत म्हणजे तिळगूळ घ्या आणि गोड बोला. त्याप्रमाणे फ्रासच्या महाराष्ट्र मंडळानेपॅरिसमधील फ्रेंच आणि इतर भारतीय लोंकाना बोलावून संगीत समारंभामध्ये तिळगूळ देण्याचा मोठा दणदणीत कार्यक्रम शनिवार १५ जानुवारीला साजरा केला. ह्या प्रसंगाला जवळजवळ १०० लोकांनी भाग घेतला आणी त्यामध्ये फ्रेंच लोकांची जास्त संख्या होती.
प्रथम गायत्री टिळक हिने सर्व प्रेक्षकांचे सुस्वागतम केले. नंतर मंडळाचे अध्यक्ष शशी धर्माधिकारी ह्यांनी मराठी, फ्रेंच आणि इंग्लिश मधून सर्वाना महाराष्ट्र मंडळाची माहिती दिली. इंग्लंडमधील मराठी मंडळाला आज ७५ वर्ष झाली आहेत, तर परीसचे मंडळ फक्त ३ वर्षाचे आहे पण तरी ते अत्यंत गतीमान असून त्याचा उत्साव अत्यंत जमाकदार आहे. जेव्न्हा २००७ साली त्याचा जन्म झाला त्यावेळी त्याचे फक्त १५ सदस्य होते पण आज त्याची संख्या ४० च्या पुढे झाली आहे व ती दिवसे दिवस पुढी वाढत आहे. फ्रान्सच्या मराठी मंडळाचे बोधवाक्यच असे आहे की मराठी पाउल पुढे पडते. आणि महत्वाचे म्हणजे नवीन सदस्य अत्यंत तरुण असल्यामुळे प्रत्येक समारंभामध्ये नवीन चैतन्य उत्पन होते.
नंतर माजी अध्यक्ष चंद्रशेखर राजगुरू ह्यांनी मकर संक्रांतीच्या दिवसाबद्दल माहिती दिली, व त्यानंतर मंडळाच्या तीन वर्षामधील महत्वाच्या प्रसंगाचे झलक दाखविण्यात आले.
पुढच्या कार्यक्रमात मंडळाची तरुण सदस्य गायत्री कोटबागी हिने कथक नृत्य करुन सर्व प्रेक्षकाना खूष करून टाकले. तिने प्रथम भगवान कृष्णाचे भजनावर कथक नृत्य केले. त्यानंतर गायत्रीने प्रसिध्य गोवर्धन डोंगरच्या इतिहासावर नृत्य करून शेवटी पांडव–कौरवांच्या युद्धामधील कृष्णाने सांगितलेल्या भगवतगीतावर सुंदर कथक नृत्य सादर केले. शेवटी तराना आणि ठुमरी ह्या प्रसिध्य नृत्याने गायत्रीने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या दुसर्या भागात पॅरिसमध्ये स्थायिक झालेले मराठी संगीतकार पंडित शिवकुमार ह्यांच्या शास्त्रीय संगीताचा खास कार्यक्रम सादर करण्यात आला. पंडित शिवकुमार ह्यांनी पार ना पायो ह्या गावती रागाने मैफिलची सुरुवात केली व नंतर देखी एक चतुर नार हे सोहनी रागमधील एक सुंदर गाणे गायिले. त्यानंतर रंगी सारी गुलाबी चुनरिया रे ह्या मस्तीमान गाण्याने सभागृहामध्ये एकदम मोहक वातावरण निर्माण केले. पण हे वातावरण निर्भय निर्गुण गुण रे गाउन्गा हे कबीर ह्यांचा भजानानंतर एकदम वेगळे झाले. पंडित शिवकुमार ह्यांनी शेवटी वीर सावरकर ह्यांचे शत जन्मा शोधिताना हे नाट्यगीत गावून सर्वांचे मन काबीज केले. सर्व प्रेक्षकांनी त्यांचे उत्स्फूरता कौर्तूक करून मोठ्या टाळ्या वाजूवून पंडित शिवकुमार ह्यांच्यावर खुशीचा गजरा टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या मुख्य सचिव आशा राजगुरू ह्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. ह्या कार्यक्रमानंतर फ्रेंच प्रेक्षक एवढे खुश झाले की त्यांनी मंडळाचा पुढला कार्यक्रम केंव्हा आहे आणि त्यावेळेस आम्ही जरूर येवू असा उत्सुकतेने प्रश्न विचारला. महाराष्ट्र मंडळाने पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वाना मराठी जेवण देण्याचे ठरविले आहे.
मकर संक्रांतीचा कार्यक्रम यशस्वी करून मंडळाने फ्रेंच आणि मराठी ह्यांमध्ये मैत्रीचा पतंग बनवून तो उंच उडवण्यास सुरवात केली आहे. हे प्रेम असेच पुढे वाढत जाईल अशा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
शशी धर्माधिकारी